#pune #lonavala#pawana dam#pratipandharpur#journey #aag #motovlogs
नमस्कार मंडळी,आज आपण निघालो आहोत प्रतिपंढरपूर नावाने ओळखले जाणारे मावळ मधील दुधीवरे आपटी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर इथे.अतिशय सुंदर निसर्गाच्या कुशीत असलेले आणि निरव शांतता असलेले हे मंदिर आणि परिसर पिंपरी चिंचवड पासून साधारण 46 किमी अंतरावर आहे.तिथे जाणारा रस्ता ही पवना धरणाच्या बाजूने नागमोडी वळणे घेत जातो.चिंचवड मधून जाताना दोन मार्ग आहेत एक कामशेत वरून आणि दुसरा सोमाटने फाटा, परंदवाडी,थुगाववरून जातो.इथे आल्यावर मनाला जी शांतता मिळते ती शब्दातून वर्णन करता येणार नाही.चला तर मग तुम्ही ही माझ्याबरोबर…..
व्हीडिओ आवडल्यास लाईक करा,कमेंट करा आणि हो आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
4 Comments
खूप छान स्थळ आहे. साक्षात पंढरपूर दर्शन झाल्या सारखं वाटलं. जय हरी विठ्ठल
छान आहे मंदिर
काही सोईसुविधा आहेत का भक्तांसाठी
पंढरपूर चे दुसरे प्रती पंढरपूर कधीच होवू शकत नाही. तुम्ही फक्त सहलीस गेले आहेत. विश्वाचा देव आहे श्री विठ्ठल