जपानच्या हायवेवरुन आम्ही ५०० कि.मि.चा भन्नाट प्रवास केला
जपानमधले रस्ते अत्यंत सुंदर आहेत रस्त्याच्या दुतर्फा काचेच्या भिंती आहेत
टोक्यो ते ओकासा असा ५०० कि.मी.चा प्रवास रस्ता मार्गाने केला
जपान आणि ओसाका रस्तामार्गे प्रवास अत्यंत सुंदर आहे
जपानची राजधानी टोक्यो ते ओसाका या ५०० किमीच्या रस्त्यावर काचेच्या भिती उभारल्या आहेत
पुर्वेकडचा देश जपान दुस-या महायुध्दानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली
जपानचे लोक शिस्तीचे भोक्ते आहेत
We traveled 500 km on the highways of Japan
The streets in Japan are very beautiful with glass walls on both sides of the road
Traveled 500 km from Tokyo to Okasa by road
Japan and Osaka road trip is very beautiful
Glass barriers have been erected on the 500 km road from Tokyo to Osaka, the capital of Japan
The eastern country Japan rose like a phoenix party after World War II
Japanese people are disciplined
१. आज आम्ही टोक्यो वरुन ओसाकाला बाय रोड निघालो होतो. कारण आजचा आमचा मुक्काम ओसाका शहरात होता. हे अंतर सुमारे ५०० कि.मि.चे आहे पण जायला लागतात फक्त साडे सहा तास. रस्ता म्हणाल तर रस्त्यावर एकही खड्डा नाही. एकही स्पिड ब्रेकर नाही. वाहनांची एकमेकांशी स्पर्धा नाही. कोणीही कोणाला ओव्हरटेक सुध्दा करत नाही.
२. स्वच्छ सुंदर आखीव रेखीव ५०० कि.मि. च्या जपानच्या या रस्त्यावरुन प्रवास करताना आपल्या डोळ्यासमोर क्षणोक्षणी सुंदर फ्रेम्स तयार होताना दिसतात. रस्त्याच्या दोन्ही बाजुला हिरवळ. सगळे वाहनचालक शिस्तीत निघालेले.
३. जपानी महामार्गावरुन जाताना कुणीही अहमिकेने पुढे जाताना दिसत नाही. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही बाजुला निसर्ग न्याहाळण्यासाठी काचेच्या भिंतीही ऊभ्या करण्यात आलेल्या आहेत. डोंगराच्या पोटात असलेल्या बोगद्यातील प्रकाश व वायुविजनाची व्यवस्था तर अत्यंत लाजबाब.
४. बरं का मित्रांनो, काही लोक जपानच्या संस्कृतीला चीनच्या संस्कृतीचा विस्तार मानतात. खरे तर जपानी लोकांनी चिनी संस्कृतीचे अनेक प्रकारे आंधळेपणे अनुकरण केले आहे. चिनी आणि कोरियन भिक्खूंच्या माध्यमातून येथे बौद्ध धर्माचे आगमन झाले. जपानच्या संस्कृतीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या लोकांना त्यांची संस्कृती खूप आवडते. त्या संस्कृतीचा त्यांना अभिमान आहे.
५. जपानमधील कोटो सारखी अनेक वाद्ये नवव्या आणि दहाव्या शतकात प्रचलित झाली. जपानमधील सुप्रसिध्द नोह नाटक तर चौदाव्या शतकातल आहे. गिटारसारखे पाश्चात्य शास्त्रीय संगीत आता जपानी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दुस-या महायुद्धानंतर जपानवर अमेरिकन आणि युरोपीयन आधुनिक संगीताचा खूप प्रभाव पडलायं. ज्यामुळे पॉप म्युझिक नावाचा लोकप्रिय बँड विकसित झाला आहे. कराओके ही या ठिकाणची सर्वात व्यापकपणे फोफावलेली संस्कृति आहे. त्याच कराओकेचा वापर अलिकडच्या काळात गाणे गाण्यासाठी करतो हे तर सगळ्यांनाच माहितायं.
६. बरं का मित्रांनो, जपान गेल्या काही दशकांमध्ये विज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे. वैज्ञानिक संशोधन, विशेषत: तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि जैववैद्यकीय संशोधन क्षेत्रात जपान अग्रगण्य देशांपैकी एक आहे. जपान मूलभूत वैज्ञानिक संशोधनात जगात आघाडीवर आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रात तेरा नोबेल पारितोषिक विजेते या देशात आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, यंत्रसामग्री, भूकंप अभियांत्रिकी, औद्योगिक रोबोटिक्स, ऑप्टिक्स, रसायने, सेमीकंडक्टर आणि धातू या क्षेत्रातही जपानचं मोठं योगदान आहे.
७. तसेच रोबोटिक्स उत्पादन आणि वापर, उत्पादनासाठी वापरल्या जाणार्या जगातील औद्योगिक रोबोटपैकी निम्म्याहून अधिकची निर्मिती जपानमध्ये केली जाते. जपान हा जगातील सर्वात मोठा ऑटोमोटिव्ह उत्पादक आहे. आणि जगातील चार सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादकांत आजमितीला जपानची गणना होते.
८. जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) ही जपानची अंतराळ संस्था आहे. जी अंतराळ आणि ग्रह संशोधन, विमान संशोधन आणि रॉकेट आणि उपग्रह विकसित करते. हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि जपानी प्रयोग मॉड्यूल (किबो) मध्ये सहभागी आहे. 2008 मध्ये स्पेस शटल असेंब्ली फ्लाइट्स दरम्यान आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जोडले गेलेयं.
९. सुमारे तीन तासांच्या प्रवासानंतर आम्ही हायवेवरील कोबे फुडमॉलवर नास्ट्या साठी थांबलो. या फुडमॉलसमोर पार्किंगची अतिउत्तम व्यवस्था केलेली असते. सगळे कसे शिस्तित चाललेले असते. आम्हीही बसमधुन पायउतार होत. फुडमॉलमध्ये नास्टा केला आणि पुढल्या प्रवासाला निघायचे म्हणून हॉटेलबाहेर पडलो. डाव्या हाताला रस्ता दुरुस्तीचे काम चालले होते.
१०. या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्तीही अगदी निगुतिने केली जाते. पहा या ठिकाणी या फुड मॉलच्या समोरचा हा रस्ता दुरुस्त करण्याची पध्दत. या रस्त्यावरचे पेव्हर ब्लॉक्स अगदी रस्त्यावर लावले होते त्याप्रमाणे निगुतिने काढुन बाजुला लावून ठेवण्यात आलेले दिसून येत आहेत.
११. पादचा-यांसोबत कोणतीही दुर्घटना घडायला नको म्हणून काही माणसेही या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात केलेली आहे. हे सारं पाहून दुस-या महायुध्दानंतर बेचिराख झालेला जपान पुन्हा कशाप्रकारे जोमाने उभा राहू शकतो याचेच प्रात्यक्षिक आज आम्ही या रस्ता दुरुस्तीच्या निमित्ताने पहात होतो.
१२. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरु नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझे अशाच प्रकारचे देश विदेशातले पर्यटन विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करुन नोटीफीकेशन ऑन करायला विसरु नका. धन्यवाद.
माझ्या चॅनेलमधुन तुम्हाला देश विदेशातली सफर करता येईल. पर्यटन विषयावरचे व्हिडिओज या चॅनेलवर तुम्हाला पाहता येतील.
Dhanraj Kharatmal. The Travellor
#TokyoJapan#JapanHighway#DhanrajKharatmal